
आमच्या विषयी - गाव एका दृष्टीक्षेपात...
कोकणचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोली तालुक्यातील केवळ ३ किलोमीटर अंतरावर हिरवी गर्द झाडी आणि बाजूला लाभलेल्या सुंदर निसर्ग रम्य अशा समुद्र किनार्यावर चंद्रनगर हे छोटेसे गाव वसलेले आहे.
चंद्रनगर गावचे वेगळे वैशिष्ठ म्हणजे नवसाला पावणारी अशी स्वयंभू देवी आहे. ती म्हणजे श्री घाणेकरिन देवी श्री घाणेकरिण देवी ही गावाची ग्रामदेवता असून देवीचे मंदिर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. सदर मंदिराला दरवर्षी अनेक भाविक तसेच पर्यटक भेट देत असतात. गावात श्री गणपती मंदिर,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशी छोटी मंदिरे आहेत.
चंद्रनगर गावालगत डॉ.बा.सा.को.कृषि विदयापीठ दापोलीचे प्रक्षेत्र आहे. विदयापीठाला येणारे शेतकरी गावातील पर्यटन स्थळांना भेट देत असतात. चंद्रनगर येथे नदी किनारी श्री कडेकरीन देवीचे मंदिर असून तिथे निसर्ग रम्य असा धबधबा आहे. मौजे चंद्रनगर गावात समुद्र किनारा,श्री घाणेकरिन देवी मंदिर, निसर्ग रम्य धबधबा, श्री गणपती मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत.
चंद्रनगर हे गाव समुद्र किनाऱ्याला वसले असून गावाला लाभलेला समुद्र किनारा हा दापोली तालुक्याच्या ठिकाणापासून तालुक्यातील सर्वात जवळचा असा समुद्र किनारा आहे. सदर समुद्र किनार्याचे अंतर तालुक्यापासून अवघे ७ ते ८ किलोमीटर इतके आहे. चंद्रनगर समुद्र किनारा हा अंदाजे दिड ते दोन किलोमीटर लांबीचा असून लाडघर व कर्दे या दोन समुद्र किनार्याच्या मधल्या भागात आहे
